आकाशी झेप घे रे पाखरा !! - भाग २

  • 5.8k
  • 2.8k

श्रीकांत आणि माझं लग्न अरेंज मॅरेज .. आम्ही दोघं लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहचण्याअगोदर एकदा भेटलोही.. मला त्या भेटीत, त्याला नकार द्यावा असं त्याच्या स्वभावात काहीच वावगं वाटलं नाही, मी कॉम्प्युटर इंजिनियर आणि श्रीकांत मेक्यानिकल इंजिनीयर , तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होता, त्याच्या घरची सगळी सुशिक्षित आणि सुसंस्कृत वाटली. माझ्या घरच्यांनाही हे स्थळ खूप आवडलं. फायनली आम्ही लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत आलो. तसं पाहिलं तर श्रीकांतला खूप श्रीमंत मुली सहज मिळाल्या असत्या. तरीसुद्धा माझ्यासारख्या गरीब मुलीला त्याने आणि त्याच्या घरच्यांनी पसंत केले म्हणून सगळे त्याचं कौतुकच करत होते.त्यांनी लग्नात पण खूप समजूतदारपणा दाखविला.. मुलीकडचे आहेत म्हणून आमची कुठेही अडवणूक केली