खेळ जीवन-मरणाचा - 1

  • 10.7k
  • 1
  • 5.5k

खेळ ? जीवन- मरणाचा अमित सावंत चौवीस वर्षांचा एक साहसी युवक होता. डोबिंवली पश्चिम भागात एका जुनाट बिल्डिंग मधल्या फ्लॅटमध्ये राहायचा.घरची परिस्थिती बेताचीच. वडील रिटायर्ड पोस्टमन..तुटपुंजी पेन्शन.घरात दोन बहिणी... दोघींची लग्न व्हायची होती. आईला दम्याचा त्रास होता. अमितला हे सारं दिसत होत पण तो काहीही करू शकत नव्हता. गेली दोन वर्ष तो नोकरीच्या शोधात होता. ना वशिला ना पैसा त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हाती नकारघंटा येत होती. पदवीपर्यंतच शिक्षण वाया गेलं असच त्याला वाटत होत.अश्या परस्थितीमुळे तो अधिक बेडर आणि निडर झाला होता. परिसरात कुठेही साप आला की अमितला बोलावल जायचं. अत्यंत विषारी सापाना तो नुसत्या हातानं पकडायचा. मोटरसायकलवर स्टंट करायचा.अरेला