साक्षीदार - 10

  • 7.3k
  • 3.7k

साक्षीदार प्रकरण १० रात्री तीन वाजता कनक ओजस च्या घरचा फोन खणखणला.त्याने वैतागून उचलला.पलीकडून पाणिनी पटवर्धन चा आवाज ऐकून तो उडालाच. “ तू झोपतोस तरी कधी रात्री?” त्याने फोन घेत विचारले. “ तुला देण्यासाठी एक अर्जंट काम आहे.” पाणिनी ने कनकच्या प्रश्नाला बगल देत सांगितलं. “ तू तुझी माणसं एका कामगिरीवर लावू शकतोस का अत्ता?” कनक , सौम्या, आणि पाणिनी खास मित्र होते. वर्ग मित्र.एकमेकांना काहीही बोलू शकत होते,एकमेकांसाठी कधीही काहीहीकरू शकत होते. कनक गुप्त हेर झाला,पाणिनी च्याच मजल्यावर त्याने ऑफिस थाटले. इन्स्पे.तारकर हा त्यांच्याच बरोबरचा खास मित्र.पण तो पोलीस झाला. या प्रकरणात काम करणाऱ्या हर्डीकर चा तो साहेब होता.अनेकदा