आकाशी झेप घे रे पाखरा !! - भाग १

  • 9k
  • 4.2k

आज ऊन जरा जास्तच वाटत होतं. केंव्हा एकदा घरी पोहचते असं झालं होतं.बिल्डिंगच्या जवळ आले तर समोरूनच लता येत होती. लता म्हणजे आमच्या बिल्डिंगचं बीबीसी चॅनल....हिला सगळ्यांच्या घरी काय चाललंय , हे जाणून घ्यायची खूप इच्छा असते..'अरे बापरे ! कसं टाळू हिला आता ? मला लवकर जायचं आहे घरी..'आलीच हिची हाक..आता काय ! आलिया भोगासी असावे सादर ...."काय मग कशी आहेस, आज माझ्याकडे काय काम काढलसं ," मी हसत हसत विचारलं.."हो बाई.. तुम्ही काय एकदम बिझी माणसं. माझ्या मनात आलं की आपणच तुला एक बातमी द्यावी.. तीही तूझ्या जवळच्या माणसांबद्दलची.."एव्हाना माझ्या लक्षात आलं हिला काय सांगायचंय..पण मी वेड पांघरूण पेडगावला