सार्या शहरात वादळापूर्वीच्या शांतता होती.प्रत्येकाच्या मनात भय दाटले होते.सर्वत्र तणाव होता.घराबाहेर पडायला सारे घाबरत होते.फोन घणघणत होते.पोलीस व्हॅन रस्त्यावर धावत होत्या. प्रत्येक चौकात लाठीधारी पोलीस तैनात होते.गरज लागल्यास खास पोलीस दल तैनात ठेवले होते.आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी शहरात ठाण मांडून होते.पालकमंत्रीही संध्याकाळी येणार होते.अफवा उठत होत्या व विरतही होत्या. घुमसत असलेल्या ठिणगीची स्फोट कधी होईल ते सांगता येणार नव्हते. मोठे- मोठे धार्मिक नेते आवाहन करत होते.सर्वधर्मीय लोकांची तोडगा काढण्यासाठी बैठकही झाली होती. पण ती कोणत्याही निर्णयाविना संपलीही होती. येणार्या संकटाच्या शंकेने सामान्य माणूस घाबरला होता. ज्याच्यामुळे हे घडले होते तो अवलिया मात्र शहराबाहेरच्या पडक्या मशिदीत चिरनिद्रा घेत पहुडला होता.एका चिरंतन प्रवासाला