साक्षीदार - 8

  • 7.5k
  • 3.9k

साक्षीदार प्रकरण ८ “ ईशा, तू मागच्या दाराने आत जाऊन पुढचा दरवाजा आतून उघड.मी ही किल्ली पुन्हा होती तिथे खिळ्याला लाऊन पुढच्या दाराने आत येतो. ” पाणिनी म्हणालातिने मान हलवली आणि मागील दार उघडून आत गेली किल्ली पुन्हा पाणिनी कडे दिली.पाणिनी ने दार लाऊन घेतले आणि पुन्हा पुढच्या बाजूला आला. पाणिनी पुढच्या बाजूला दारा बाहेर आला.ईशा च्या पावलांचा आवाज त्याला आतून आला.तिने दार उघडले.पाणिनी ला दिसलं की हॉल मधला नाईट लँप लागला होता, तिथून वरच्या मजल्या वर जाणारा जिना दिसत होता, हॉल मधील फर्निचर ,आरशाचे कपाट, छत्री चा स्टँड,रॅक या सर्वाकडे त्याचे लक्ष गेले. रॅक वर स्त्रीचा कोट होता.तीन छत्र्या