घुसमट...

  • 8.8k
  • 2.8k

घुसमट. . होय प्रश्न एकच कामावर जावं की न जावं?गेले तर त्या हिडीस नजरा शरिरावरुन फिरताना नकोसा होनारा जीव.तो धडधडता जीव घेऊन दिवसभर करावं लागतं काम पोटासाठी.पुरत नाही नवर्‍याचा अपुरा पगार भागत नाही घरखर्च.होत नाही मुलांच शिक्षण ,अशाच अन अशाच अनेक कारणापायी सहन करावं लागतं सगळं.अन घुसमटणारं मन सांभाळत कराव्या लागतात नकोशा गोष्टी.जरी असलो कामाच्या ठिकाणी तरी जाणवते एक अस्वस्थता अन् असुरक्षितता . कारण फिरत असतात श्वापदं माणसाच्या रुपात.जाणवत असतं भय कधी पडेल झडप अन घेतील घास माझ्या इज्जतीचा,तोडतील लचका एखाद्या जंगली कुत्र्यांप्रमाणे.अन चघळतील हाडे आमच्या अब्रुची आणि हसतील विकट महाभारतातील दु:शासना प्रमाणे आणि मिरवतील शौर्य एका अबलेवर हात टाकल्याचे