धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 2

  • 7.3k
  • 1
  • 3.4k

प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर तोबा गर्दी होती त्यातले बरेचजण पर्यटक वाटत होते. प्रवासाच्या बॅगा सांभाळत ट्रेनची वाट बघणारे एवढे पर्यटक बघितले आणि माझ्या मनात आलं, बापरे! सगळे माथेरानला निघाले की काय ? आपल्याला नेरळ स्टेशन येईपर्यंत ट्रेनमध्ये बसायला जागा मिळेल की नाही ??.पण तेवढ्यात तेजस एक्स्प्रेसची घोषणा झाली.. मग समजलं की अरे ,हे सगळे तर गोव्याला चालले आहेत..तेजस एक्स्प्रेस गेली आणि प्लॅटफॉर्म वरील गजबजाट थोडा कमी झाला..कर्जत ट्रेनची वेळ होऊन गेली तरी ट्रेन यायचं नावचं घेईना..माझा जीव परत वर खाली होऊ लागला.. कारण ही कर्जत ट्रेन आली नाही तर अर्ध्या तासाने असणाऱ्या खोपोली ट्रेनमध्ये आपल्याला काही चढायला मिळणार नाही आणि