स्ट्रगल - भाग-2

  • 6.3k
  • 3.1k

चहा घेतल्या नंतर मंगेश निघून जातो आणी विक्रम व गणपत गप्पा मारत मारत घरा कडेपरतात.घरी पोहोचताच...दुर्गाबाई दारात उभ्याच असतात त्यात परत विक्रमला बघताच दुर्गाबाईंचा पारा चढतो आणित्या त्याच्या वर परत चिडतात."तु? परत इथे, मी तुला सांगितल होत ना हे घर माझ आहे मी कुणालाच देणार नाही. मग इथेकशाला आलास?"खरा प्रॉब्लेम काय आहे हे एव्हाना विक्रमला समजल होत. तो शांतपणे सगळ ऐकून घेतो मगदुर्गाबाईंना शांत करत समजावतो."आजी. झालात का तुम्ही शांत? अहो मी तुमचं घर तुमच्या कडून कसा बळकावेन मी तरतुमच्या नातवा सारखा आहे न. मी इथे राहण्याचे तुम्हाला पैसे देईन तुमच हे मेहनतीनउभ केलेल घर नाही घेणार. आता तर मी