ते चार दिवस - भाग 3

  • 5.4k
  • 1
  • 2.5k

ते चार दिवस 27 डिसेंबर 2020 स्थळ - चौकुळ - वेळ सकाळी 6.00 चौकुळमध्ये दाट धुकं पडल होत.अगदी दोन फुटांवर दिसत नव्हत. शरदच्या बंगल्याच्या आवारात एकून दोन कार तयार होत्या.एका कारमध्ये शरद व रेवती होती. तर दुसर्या कार मध्ये समीर,संजना व प्रशांत व त्यांच सामान त्यात लॅपटॉप,त्यानी चौकुळचे शूटिंग करण्यासाठी आणलेला ड्रोन,प्रशांतचे स्केचबुक इत्यादी. गावातले काही तरूण आपणही गाडी घेवून येतो अस म्हणत होते.पण इन्स्पेक्टर खानच्या सूचनेवरून शरदने नम्रपणे त्यांना थांबवले.चंद्रिकेला सोडवल्यावर पहिल्यांदा गावातच घेवून येवू अस सांगितलं. कारच्या पिवळ्या लाईटस् चालू करून कार संथपणे पुढे सरकल्या.गावकर्यांचे डोळे पाणावले होते.आंबोली घाट उतरेपर्यत धुकं राहणार होत.कोणत्याही परिस्थितीत काळोख पडण्यापूर्वी अलिबागला पोहचायच