नाते बहरले प्रेमाचे - 6

  • 10.7k
  • 5.7k

गुढीपाडवा तर छान झाला साजरा ... रात्री विक्रांतला यायला लेट झालं..आरोही जागीच होती..ती डिनर साठी त्याची वाट पाहत हाॅल मध्ये हातात बुक्स घेऊन तिथेच डायनिंग टेबलवर डोकं ठेवून झोपली होती... विक्रांत रूममध्ये गेला.. त्याला आरोही काही दिसली नाही.. त्याने शारदा काकु ला फोन करून पाहिला तेव्हा त्याला कळलं की आरोही त्याचा डिनरला वेट करत होती.. विक्रांत खाली गेला.. आरोही.. " त्याने आवाज दिला " आरोही गाढ झोपेत होती... आरोही त्याने तिला थोडं जोरात आवाज दिला... " हम्म.. " आरोही डोळे किलकिले करून उठली तु जेवन केलं?... " विक्रांतने आरोहीला विचारलं नाही.. " आरोही विक्रांत उठला आणि तिच्या साठी जेवणाची प्लेट