ते चार दिवस - भाग 2

  • 5.9k
  • 2.7k

ते चार दिवस --भाग 2 26 डिसेंबर 2020 स्थळ - चौकुळ सकाळचे नऊ वाजले होते. शरद गावडेच्या बंगल्यासमोरच्या परिसरात सुमारे शंभराच्यावर गावकरी हजर होते. गावात अपहरणकर्त्याच्या निषेधाचे फलक लागले होते. सर्व स्थानिक वर्तमानपत्रात अपहरणाची बातमी आली होती.सर्वजण पोलीसांची वाट बघत होते. एवड्यात पोलीसांची गाडी आली. इन्स्पेक्टर इलियास खान गाडीतून उतरले.उंच व तगडा असा हा तरूण इन्स्पेक्टर गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जायचा.घारीसारखी तीक्ष्ण नजर..चौकस बुध्दी.. समोरच्याला कोड्यात टाकणारे प्रश्न यामुळे प्रत्येक केसमध्ये तो यशस्वी व्हायचा.बंगल्याच्या बाहेर ऐवडे लोक बघून तो वैतागला.पण गावकर्यांच्या भावना लक्षात घेवून तो गप्पपणे बंगल्याच्या आत गेला.आत हॉलमध्ये रिमा, उषा,समीर,संजना,प्रशांत व घनश्याम ऊभे होते. " आणखी कोन आहे