ते चार दिवस - भाग 1

  • 8.6k
  • 3.8k

ते चार दिवस भाग1-- 25 डिसेंबर 2020 स्थळ- चौकुळ सावंतवाडी चंद्रिका,रिमा व उषा बंगल्याच्या गच्चीवर गप्पा गोष्टी करत होत्या.वेळ रात्रीची अकरा वाजताची होती.आकाशातल्या चांदण्या .. गार वारा व रातकिड्यांचा आवाज याशिवाय सारा परिसर शांत होता. "चंद्रिके ; अग ते गाण म्हण ना जे तू 'लिटल चॅम्पस्' च्या फ़ायनलला गायली होतीस. " उषा म्हणाली. "अग आत्ता या वेळी?" "ये , गा ना..."रिमाने विनवणी केली. " गाते ग..." चंद्रिकेने गाणे सुरू केले. ' सांज ये गोकुळी..सावळी-सावळी ' तिचा सुरेल आवाज वातावरण सजीव करून गेला.तिघिही गच्चीच्या कठड्यावर टेकून उभ्या होत्या.चंद्रिका गाण्यात समरस झाली होती.अचानक चंद्रिकेला मानेवर थंडगार वस्तूचा स्पर्श जाणवला...तिच गाण थांबलं.काय झाल