चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 16 - अंतिम भाग

  • 7k
  • 1
  • 2.6k

भाग -१६समारोहआज रेवातीनगरमध्ये उत्साहाला उधाण आले होते.दिशा अजून उजळल्या नव्हत्या.पण रेवती देवीच्या मंदिराचा गाभारा,सभामंडप व त्यापुढील विस्तीर्ण मैदान प्रजाजनांनी भरून गेले होते. मंदिरासमोरील किनारा...तिथली सोनेरी वाळू ..त्यात विसावलेल्या असंख्य होड्या....दूरवर उभी असलेली गलबत अजूनही अस्पष्ट दिसत होती.समुद्रावरून येणारा गार वारा..लाटांचा खळखळाट व उच्चस्वरात चालू असलेले मंत्रोच्चार यामुळे सारे वातावरण भरून गेलं होते.आज रेवतीनगरचा शाप व मद्र देशावरच संकट संपणार होते.सारे रेवतीनगर सजवलेलं होत. गुड्या, तोरण, मंडप जागोजागी उभारले होते.प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या.चौकाचौकात सुंदर देखावे उभारले होते. मद्र देशातील व शेजारच्या देशातील लोक हा सोहळा पाहण्यासाठी ठाण मांडून होते.रेवतीनगरमधील धर्मशाळा...देवालये..यजमानांची घरे पाहुण्यांनी व प्रवाश्यानी भरून गेली होती....गजबजून गेली होती.रेवतिदेवीच्यामस्तकावर