प्रकरण -३ पाणिनी पटवर्धन त्याच्या गाडीत बसला, बोटात थोटूक धरून त्याने सिगारेट पेटवली.खरं तर थोड्या वेळेपूर्वीच त्यानं धूम्रपान केलं होतं. त्याचा चेहेरा पूर्ण एकाग्र झाला होता., त्याचे डोळे चमकले. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव नव्हते. फक्त त्याचा अस्वस्थपणा दर्शवणारी एकच गोष्ट म्हणजे तो सतत सिगारेट पेटवत होता, एक झाली की दुसरी, दुसऱ्या नंतर तिसरी,, एका तासापेक्षा जास्त काळ. थेट रस्त्याच्या पलीकडे ती इमारत होती ज्यामध्ये मिर्च मसाला चं ऑफिस होतं. तेवढ्यात फिरोज लोकवाला इमारतीतून बाहेर आला. लोकवाला त्याच्या कडे यंत्रवत दृष्टीक्षेप करून, चालता झाला.पाणिनी पटवर्धनने सिगारेट ओढली आणि स्टार्टरवर पाय दाबला.आणि गाडी वाहतुकीच्या प्रवाहात घातली. लोकवाला कोपऱ्यात उजवीकडे वळला आणि टॅक्सी