साक्षीदार - 2

  • 9.6k
  • 5.8k

प्रकरण २ फिरोज लोकवालाची त्वचा खडबडीत होती त्याने लोकरी सारख्या कापडाचा सूट घातला होता. त्याचे डोळे सौम्य तपकिरी, पण मृत आणि निर्जीव वाटत होते. त्याचे नाक मोठे होते, प्रथम दर्शनी तो सौम्य आणि निरुपद्रवी वाटत होता. "ठीक आहे," तो म्हणाला, "आपण येथे बोलू शकता." पाणिनी ने मानेनेच नाही म्हंटले. “ या जागेत तुम्ही यांत्रिक करामती करून ठेवल्या असतील,आपल्यातले बोलणे रेकोर्ड होण्यासाठी.मला अशा ठिकाणी बोलायचंय जिथे आपल्या दोघांशिवाय कोणी नसेल.” पाणिनी म्हणाला “ कुठे?” फिरोज लोकवाला ने विचारलं “माझ्या ऑफिसात.” पाणिनी म्हणाला फिरोज लोकवाला हसला. “ म्हणजे मी इथे जे केलंय असं तुम्हाला वाटतंय तेच तुमच्या ऑफिसात तुम्ही केलं असेल. मी