चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 15

  • 5.7k
  • 2.3k

भाग -१५रेवतीनगरात - स्वागतघामाघूम झालेले मद्रवासी गलबातवर पोहचले.दंतवर्मानी सरजूला काही कोळ्यांना माघारी पाठवायला सांगितले.चंदेलमध्ये चंद्राची आई, बहीण गौरी वाट बघत होते.चंदेलवासीय कोळी चार होड्यांतून चंदेलला रवाना झाले. सरजू, चंद्रा,वाघ्या व आणखी चार कोळी एवढेच रेवातीनगरला जाण्यासाठी थांबले.आता प्रवास थोडफारच शिल्लक होता.सुरवातीला काळोखातून व नंतर चंद्राच्या शीतल चांदण्यात प्रवास सुरू झाला.चंद्रा, सरजू व दंतवर्मां गलबताच्यां फळ्यांवर पहुडले होते.आकाशात त्रयोदशीचा चंद्र चांदण्याची बरसात करत होता.या चांदण्यात काही तारका लक्ष वेधून घेत होत्या. मध्येच पाण्यात सूर मारणारे माशे चांदण्यामुळे चमकत होते.मधे मधे निशाचर पक्ष्यांच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता. समुद्री पक्षांचे पंख लांब व मजबूत असतात.कारण त्यांना शिकार पायात किंवा चोचीत पकडून दूर