अंबानीचा कोंबडा

  • 8.4k
  • 1
  • 3k

'कु-कु----कुकूचकू ----' पहाटे-पहाटे शेजारच्या कोंबड्याने जोरदार बांग दिली .तंगड्या ताणून पालथा झोपलेला दत्तू धडपडून जागा झाला.झोपल्या जागी अंग धनुष्यासारख ताणत आळस देत बोलला--"'आये,च्या टाक ना वाईच." चूलीजवळ भाकर्या भाजत असलेली सुभद्रा भूत बघितल्यासारखी दत्तू कडे पाहत राहिली.तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. "आर----कुणी झपाटलं की काय तूला?--पार सूर्व्या डोईवर येईस्तवर लोळत असतो अन् आज असा पहाटेचा उठला ह्वय." "अग ,आजच्याला पेडगावला कोंबड्यांच्या झुंजी हायती." "कर्म मेल,कोंबड्याच्या झुंजीपायी हे कोंबड तुरा फडफडवत उठल व्हय. मेल्या, सुक्काळीच्या --- , ऊसाला पाणी कोण देणार?" "आल्यावर देईन की " मिश्री लावत दत्तू बोलला. दत्तूला कोंबड्यांच्या झुंजीच भलतच वेड. पंचक्रोशीत जिथं -जिथं कोंबड्यांची झुंज असायची तिथ