️️रविवार ️️

  • 8.4k
  • 2.7k

रविवार उजाडतो तोच मुळी आळस घेऊन.... तिला नेहमी प्रमाणे सकाळी लवकर जाग येऊनही अंथरुणात लोळत पडावस वाटतंय...पूर्ण आठवडाभर शनिवार आणि रविवारसाठी मनात आखलेले कितीतरी बेत फसलेले असतात.. ते सगळे नेहमीप्रमाणे बारगळलेले बेत आठवून तिला खुदकन हसू येतं...घड्याळाचा काटा त्याच्या नेहमीच्या गतीने पुढे पुढे जात असतो... तो बाजूलाच शांतपणे झोपलेला असतो.. आज त्याला कामावर जायची घाई नाही की लोकल पकडायची चिंता नाही.. त्याचा तो शांत चेहरा निरखत असताना एक खट्याळ विचार तिच्या मनात चमकून जातो आणि ती त्याच्या गालावर हळूच चिमटा घेत , "अहो उठताय ना? आठ वाजले, आठवडाभराची राहिलेली किती काम उरकायची आहेत आपल्याला?? पण आज तोही इतका निवांत असतो