सतीशला रात्री दोन वाजता काळेगाव च्या बसस्टँड वर सोडल्या गेले ....... आता एवढी रात्र झाली नसती पण त्याला जिल्ह्याच्या ठिकाणाहून यायला बराच उशीर झाला होता ...... सतीशला स्टँड वर सोडले तेव्हा , तिथे काळे कुत्रे सुद्धा नव्हते ........ तो फक्त एकटाच होता ...... त्याला खात्री होती की आपल्याला सकाळी सहा वाजेपर्यंत बस लागणार नाही ....... काळेगाव म्हणजे खेड्यामधून शहरीकरण होऊ पाहणारे गाव ......... पण बसस्टँड शहराच्या थोड अलीकडे अडगळीत पडल्या सारखे होते ..... नेहमी प्रमाणे प्रशासनाने यावेळी सुद्धा बसस्टँड च्या विकासाकडे दुर्लक्ष केल्या कारणाने , हे हाल होते ....... सतीश काळेगाव वरून पुन्हा सत्तर किलोमीटर वर असलेल्या खडेगावकडे जाणार होता