कूस! - ०४. (शेवट)

  • 7.7k
  • 3.8k

आतापर्यंत आपण पाहिले, पाटील कुटुंबीयांनी केलेल्या क्रूर गुन्हेगारीचा वैयक्तिक पातळीवर पोलीस उप निरीक्षक नाईक यांना जास्तच मन:स्ताप सहन करावा लागला होता. आता पुढे! पाटील कुटुंबियांना ताब्यात घेण्याचे आदेश निरीक्षकांनी शिपायांना दिले. पाटील कुटुंबियांना ताब्यात घेत निरीक्षकांसोबत पोलिसांची एक तुकडी ठाण्याकडे रवाना झाली. गाडीत निरीक्षकांच्या डोक्यात नको ते विचार सुरू होते; ज्यामुळे त्यांचे डोके दुखू लागले! ठाण्यात पोहचत पोलिसांकडून फौजदारी खटला नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुख्य आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत सोबतंच गुन्ह्यात सामील असलेल्यांवर देखील विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. या घटनेने निरीक्षकांना चांगलाच मनःस्ताप झाला. या घटनेचा त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंध असल्याचे त्यांना वारंवार जाणवत होते! विचार करून डोकं