कूस! - ०३.

  • 8.2k
  • 4.3k

आतापर्यंत आपण पाहिले, पोलीस उप निरीक्षकांच्या बदलीत पाटलांचा हात असल्यामुळे घटनेच्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणे त्यांच्यासाठी वर्दीला मान मिळवून देण्यासारखे होते! आता पुढे! "अतिगुह्यतरं तत्वं सर्वमंत्रौघविग्रहम। पुण्यात् पुण्यतरं चैव परं स्रेहाद् वदामि ते।।" तिसऱ्यांदा हा मंत्र कानी पडताच नाईकांनी एकच जोरदार काठी बाबाच्या मांडीत घातली! "आह!!!" जोरदार बसलेल्या माराने बाबा विव्हळले आणि सांगायला तयार झाले. नाईकांनी शिपायांना सांगून बाबाचे स्टेटमेंट नोंदवून घेतले. बाबाच्या माहितीनुसार एकूण एक मुद्दा उघडकीस आला. नाईकांसाठी हे प्रकरण आता स्वतःच्या आत्मसन्माना पुरतेच मर्यादित राहिले नव्हते! तर त्या निष्पाप महिलेवर केल्या गेलेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे रक्त सळसळत होते. पाटील कुटुंबियांच्या डीएनए सॅम्पलचे तात्काळ आदेश जारी करण्यात आले.