कूस! - ०१.

  • 11.4k
  • 5.6k

"गळफास लावून नववधूची आत्महत्या!"या घटनेने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले! कारण ती नववधू दुसरी तिसरी कोणी नसून एका प्रतिष्ठित माजी कॅबिनेट मंत्र्याची सून होती. पण त्यांना यावर्षी तिकीट देण्यात न आल्यामुळे ते राजकारणातून बाहेर पडले होते. घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. बाहेर लोकांची गर्दी जमली, तर काही लोकं समूहात कुजबुज करत उभी राहून आत ढुंकून पाहण्याचा प्रयत्न करू लागली.पंचनाम्या नंतर आतील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेने तात्काळ रुग्णालयात रवाना करण्याचे वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले आणि पोलिसांची मुख्य तुकडी घटनास्थळी तपासणी करण्यात व्यस्त झाली. ज्या खोलीत घटना घडली होती; ती खोली इथून पुढचे २४ तास पोलिसांच्या निरीक्षणात राहणार होती. त्यामुळे घरातील बाकी