चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 12

  • 6k
  • 1
  • 2.6k

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर 12१२. पुन्हा समुद्रावर व नवी आव्हानेदुसऱ्या दिवशी भल्या पहाटे चंद्रा व दंतवर्मा उठले. अजून पूर्व दिशा प्रकाशली नव्हती. पण पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. मंद सुगंधाची पखरण करत पहाटवारा अंगाला स्पर्श करून जात होता. त्यामुळे मन उत्साहित होत होते. दोघांनीही झऱ्यावर जाऊन स्नान केलं. एव्हाना आकाश नारिंगी रंगाचं झालं होतं. निघण्याची सारी तयारी झाली होती. मयूरांनी दिलेला फलाहार व पाणी पिऊन ते नदीकिनारी गेले. सोबत मंगा, डुंगा व काही मयूर होते. पाण्याचे दोन छोटे बुधले,तीरकमठा, दंतवर्मांचा अनमोल खजिन्याची पेटी तराफ्यावर ठेवण्यात आली. सोबत फळांनी भरलेली टोपलीही होती. चंद्राने डोळे भरून साऱ्यांकडे पाहिले... त्याने साऱ्यांना हात