अपयश येण्याचं मुख्य कारण काय असतं? काही जण म्हणतील अपुरे प्रयत्न, आळशीपणा, धाडस न करण्याची वृत्ती आणि असं बरंच काही. ही सगळी जरी अपयशी होण्याची अगदीच योग्य उत्तरे असली तरी त्यातील सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोठी स्वप्न न पाहण्याची सवय. अनेक जण असे असतात जे जेवढं काही मिळालं आहे त्यामध्ये सुखी, समाधानी असतात. जेवढं मिळालं आहे त्यात समाधानी असणं ही आपण चांगली बाब मानत असलो तरी हीच गोष्ट आपली प्रगती रोखून धरण्यासाठी कारणीभूत ठरणारी असते. मुळातच सामान्य माणसांची स्वप्न, इच्छा, आकांक्षा या अगदीच सामन्य असतात. एक स्वतःचं घर, गाडी, हसतं खेळतं कुटुंब, पोटापुरतं अन्न आणि गरजेपुरते पैसे हे सर्वधारणपणे सामान्य