जगण्याचं कारण शोधा

  • 8.4k
  • 1
  • 2.9k

रात्री मी गाढ झोपेत असताना एकच्या सुमारास अचानक माझ्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. दिवसभराच्या कामकाजामुळे खूप थकवा आल्याने मला गाढ झोप लागली होती.माझ्या डोळयांच्या पापण्या जड झाल्यासारख्या वाटत होत्या. मी कसेतरी अर्धवट डोळे उघडून उशालाच ठेवलेला मोबाईल पाहिला. माझा मित्र मल्हारचा फोन होता.मल्हारचा फोन इतक्या रात्री का आला असेल याचा मला प्रश्न पडला. मी फोन उचलला. “हॅलो!” “हॅलो! तू लवकर सरकारी दवाखान्याकडे ये.” मल्हार जरा घाईत आणि घाबरतच बोलला. त्याच्या अशा बोलण्याने मला काळजी वाटु लागली. माझी झोप कुठल्या कुठे उडून गेली. काय झाले असेल याचाच विचार करत मी त्याला विचारले, “ काय झालं मल्हार?” “तू आधी इकडे ये.आल्यावर