धुस कुटुस

  • 6.5k
  • 2.4k

आणि खळबळ उडाली. 'विश्व विद्यानिकेतन' चा सुवर्ण जयंती समारंभ थाटामाटात साजरा केला जाणार असल्याच्या घोषणे बरोबरच डॉक्टर लीली पुटियन यांच्या नियुक्तीची खुशखबरही त्याच वेळी संस्थे ला मिळाली होती; हा तर दुग्धशर्करा योगच होता. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या या इन्स्टिट्यूटच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच, त्याच संस्थेच्या माजी विद्यार्थ्याला डायरेक्टर पदाकरिता नियुक्त करण्यात आले होते. लीली पुटियन यांचा बायोडेटा बघताक्षणीच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटने एक मताने त्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर लीली पुटियन ओमान येथील एका कॉलेजमध्ये डीन पदावर होते पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचे नाव इथेही दुमदुमत होते. ते इथल्या 'माजी विद्यार्थी संघटनेचे ' सदस्य सुद्धा होते आणि