चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 10

  • 5.8k
  • 2.7k

१०. मंगाची सुटका आणि शिंगाड्यांची वाताहतचंद्रा, दंतवर्मा व इतर सारे शिंगाड्यांच्या नरबळी देण्याच्या जागी पोहोचले. तिथे सारे शिंगाडे जमले होते. भयाण किंकाळ्या मारत सारे नाचत होते. त्यांच्या त्या विचित्र देवाच्या शेजारीच असलेल्या लाकडी खांबावर मंगाला बांधलेले होते. समोर मोठा जाळ पेटत ठेवलेला होता व त्यात तो पुजारी ती माती फेकत होता व त्यामुळे पिवळसर-नारिंगी रंगाच्या ज्वाळा वर उसळत होत्या. आज सारे शिंगाडे खुशीत होते, कारण मयुरांच्या जमातीचा प्रमुख ‘मंगा’ त्यांच्या तावडीत सापडला होता.त्याचा बळी देऊन नरमांस भक्षण करण्यास ते अधिकच उत्तेजित होऊन नाचत होते. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरची शिंगे गदागदा हलत होती. विविध प्राण्यांची पोकळ हाडे फुंकून ते भयावह आवाज निर्माण