लग्नाअगोदर आणि लग्नानंतर - भाग २

  • 10.6k
  • 5.1k

सगळ्यात अगोदर मी तिच्या नकळत सतीशला भेटायचं ठरवलं.. कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात आणि असे प्रॉब्लेम्स हल्ली बऱ्याच जणांना येतात.अशा वेळी विचारविनिमय करून मग त्यावर सल्ला देणं कधीही चांगलं..सतीश माझाही कॉलेज मित्र असल्याने सहज एकदा वाट वाकडी करून त्याच्या ऑफिसमध्ये गेले.. आमचे साहेब कामात एकदम गढून गेले होते.. मला बघितल्यावर , अगं इकडे कुठे तू ??आले सहज, मित्राला भेटायला अपॉइंटमेंट लागते का ?? मी हसत हसत विचारलं..अगं असं नाही ...You are most welcome..इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या..मग तोच म्हणाला, कशी झाली तुमची ट्रीप .नीला खुश आहे आल्यापासून.सतीश, मला थोडं पर्सनल बोलायचं आहे. येथे बोलू शकतो का की बाहेर जाऊया ?त्याने थोडा