संत वेणास्वामी.

  • 7.9k
  • 1
  • 3.1k

*भावनारहित वेणी उरलीसे भजनी*आज चैत्र कृष्ण चतुर्दशी, सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांच्या स्वनामधन्य शिष्या सद्गुरु श्रीसंत वेणास्वामी यांची पुण्यतिथी. तसेच राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील अवलिया विभूतिमत्त्व श्रीसंत चिले महाराज यांचीही पुण्यतिथी ! सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामींच्या परिपूर्णकृपेने अलौकिक योगानुभूती घेतलेल्या श्री वेणाबाई या फार विलक्षण विभूती होत्या. त्यांची अनन्य गुरुनिष्ठा आणि त्यामुळे लाभलेली उत्तुंग आत्मानुभूती ही खरोखर आश्चर्यचकित करणारीच आहे. श्री वेणास्वामींचे वाङ्मय वाचताना आपण मोहरून जातो. त्यांच्या जीवनात सद्गुरुकृपेचा संपन्न वसंतऋतू एवढा बहरलेला आहे की शब्दच नाहीत ते व्यक्त करायला. त्यांची प्रत्येक रचना अशाच विविधांगी अनुभवफुलो-याने सुगंधित झालेली आहे. श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक दिलेल्या दिव्यनामाने