श्री संत एकनाथ महाराज। २०

  • 6.8k
  • 2.4k

संत एकनाथ महाराज २० एकनाथी भागवत - श्लोक १६ वा यदा चित्तं प्रसीदेत इन्द्रियाणां च निर्वृतिः । देहेऽभयं मनोऽसङंग तत्सत्त्वं विद्धि मत्पदम् ॥१६॥ वाढलिया सत्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न । कामक्रोधलोभाचें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥४१॥ जें चित्त वणवणी विषयांलागीं । तें उदास होय विषयभोगीं । विषय आदळतांही अंगीं । तैं विषयसंगीं विगुंतेना ॥४२॥ जेवीं जळामाजीं जळस्थ । पद्मिणीपत्र जळीं अलिप्त । तेवीं विषयांमाजीं चित्त । विषयातीत मद्बोधें ॥४३॥ सदा मरणभय देहासी । तें मरण आलिया देहापाशीं । भय नुपजे सात्विकापासी । भावें मत्पदासी विनटले ॥४४॥ जंववरी भासे मीतूंपण । तंववरी अवश्य बाधी मरण । सात्विक मत्पदीं अभिन्न ।