सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 8

  • 7.7k
  • 3.5k

विक्रांत जेवण करून रूम मध्ये आला. त्याचे आणि गीतु चे फ़ोटो बघू लागला. ख़ुप साऱ्या आठवणीं त्या अल्बम मध्ये होत्या.विक्रांत एका फ़ोटो जवळ थांबला . त्या दिवसाची आठवण आज ही जशीच्या तशीच त्याच्या लक्षात होती. त्याच्या हस्ते संयोगिता ला शिल्पकलेचे सर्टिफिकेट आणि ती स्पर्धे मध्ये पहिली आली त्याचे मेडल तिला देण्यात आले तो क्षण फ़ोटोत कैप्चर केला होता. तेव्हा संयोगीताला पाहुनच तो तिच्या प्रेमात पडला होता. सिल्की केस,काळेभोर टपोरे डोळे ,गोरा रंग,गुलाबी नाजुक ओठ,आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास ,हस्तमुख अशी संयोगिता तिला पुन्हा पुन्हा पाहन्याचा मोह विक्रांत ला होत होता. तो त्या आठवणीत गढुन गेला. विक्रांत ते एक शिल्पकलेचे प्रदर्शन आहे तुला