चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 7

  • 6k
  • 2.9k

. नव्या साहसावरदुसऱ्या दिवशी चंद्रा सकाळी थोडा उशिरानेच उठला. तोंड वगैरे धुवून ताजातवाना झाल्यावर डुंगाने त्याच्यासमोर फळे, पाणी व झाडांच्या फळांपासून बनविलेले पेय ठेवले. डुंगाच्या पाहुणचाराचा आस्वाद घेतल्यावर त्याने डुंगाच्या बाबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. डुंगाने हसतच मानेने होकार देत त्याला आपल्या झोपडीत नेलं. तिथं डुगाचा बाबा ‘मंगा' मातीने तयार केलेल्या एका उंचवट्यावर बसला होता. चंद्राने मंगाला हात जोडून नमस्कार केला. मुला तुला आमचा उत्सव आवडला?'' मंगाने चंद्राला हसून विचारले"होय बाबा.. ते नृत्य व गाणी छान होती." चंद्राने तेउत्तर दिले. 'तुला त्या.. अनोळखी माणसाविषयी विचारायचं होतं ना?', “होय. मी त्याच्याच शोधात इथं आलोय. कुठं दिसला तो तुम्हाला?”"तो नदीच्या उताराच्या दिशेने