नक्षत्रांचे देणे - ५२

  • 7.3k
  • 3.5k

'पदरावर जरतारी मोर आणि हिरव्या रंगाची जरीकाठ असलेली साडी नेसून भूमी तयार होती. नाकात नथ घालून तिने ओठांवर लाल चुटुक लिपस्टिक लावली. मेकअप आर्टिस्टने तिच्या गळ्यात एक सोन्याचा हेवी असा हार घातला आणि त्यावर मॅचिंग असे मोठे कानातले कानात घातले. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला त्याच्या मध्ये मध्ये क्षितिजने पाठवलेल्या जाड पाटल्या घालून भूमीला तयार केले. ती सुंदर दिसत होती. केसात एका बाजूला खेवलेली केवड्याची आणि जरबेरिया ची लाल फुले तिच्या कानावर येऊन तिच्या चेहेर्याची सुंदरता अजूनच वाढवत होती. एक चंद्रकोर कपाळावर लावून भूमीने आरशात पहिले. खाली मंत्र पठन करायला सुरुवात झाली होती. लग्नघटिका जवळ आली होती. निधी तिला न्यायला