मैथिली अजूनही ऍडमिट होती. भूमी तिला भेटायला जात असे. निधीशी बोलून झाल्यावर डॉक्टर ना फोन केला आणि मैथिलीच्या तब्येतीची विचारपूस केली. मैथिली काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताना डॉक्टरनी पहिले होते. पण तिला स्पष्ट बोलता येत नव्हते. कदाचित तिला कोणाला तरी बोलवायचे असावे. त्यामुळे ती तसे इशारे कात होती. तब्येतीत सुधारणा काहीच नव्हती उलट तिची तब्येत अजून बिघडत चालली होती. लंडनहून स्पेशल ट्रीटमेंट घेऊन आल्यावरही तिला बरे वाटत नव्हते. त्यामुळे डॉक्टर देखील काळजीत होते. मैथिली साठी भूमीला खूप वाईट वाटले. ती बारी व्हावी यासाठी काय वाट्टेल ते करण्याची सगळ्यांची तयारी होती. दर्दैवाने तास काहीही पॉसिटीव्ह रिस्पॉन्स मिळत नव्हता. ***** कंपणीतील काम आवरल्यावर