नक्षत्रांचे देणे - ४५

  • 6.7k
  • 2
  • 3.6k

निधी निल बरोबर थोडावेळ घालवून भूमी काइट्स माउंटनकडे आली. एवढ्या महिन्यांनी ती आज तिथे आली होती. ती येऊन एका टेबल शेजारी खुर्चीवर बसली. मूड अगदी डाऊन होता. एक कॉफी ऑर्डर करून ती पलीकडे असणाऱ्या डोंगरावरून अस्ताला जाणारा सूर्यास्त बघत होती. मस्त तांबूस झालेलं आकाश आणि त्यामधून डोंगराआड लपणारा सूर्य, सगळीकडे पडत चाललेला अंधार ती शांत चित्ताने आपला डोळ्यांनी टिपत होती. ''अजून त्या नक्षत्रांकडे बघत बसण्याचे वेड गेलेले दिसत नाहीये.'' क्षितीज तिच्या मागे उभा होता. तिने मागे वळून पहिले. ''त्याला वेड नाही छंद म्हणतात.'' भूमीने त्याच्याकडे बघून उत्तर दिले. ''इथे एकटीच काय करतेस?'' क्षितिज तिच्या दिशेने येत म्हणाला. ''का? हि जागा