नक्षत्रांचे देणे - ४३

  • 6.6k
  • 3.6k

गाडीमध्ये क्षितिज भूमीचाच विचार करत होता. ती जशी आधी होती तशीच होती. जराही बदल झाला नव्हता. ती आपल्याशी खोट का बोलली? आणि लंडनला गेल्यावर एकही फोन करू शकली नाही. मेसेज नाही. त्याने केलेल्या फोनला रिप्लाय करू शकली नाही. का? असे बरेचसे प्रश्न त्याला सतावत होते. खरतर ती भेटली तेव्हा तिला कडकडून मिठी मारावी असे त्याला वाटले होते. तिच्याशी भांडाव, तिला जाब विचारावा असेही वाटले, पण त्याने तसे केले नाही. आता तो आपल्या आयुष्यात खूप पुढे गेला होता. त्याच्याही पुढे जाण्यासाठी तो प्रयत्न करत होता. आणि आता त्याच्या आणि त्याच्या कंपनीच्या मध्ये त्याला कोना दुसऱ्या तिसऱ्याची गरज नव्हती. फक्त आपल्या SK