नक्षत्रांचे देणे - ४०

  • 6.7k
  • 3.6k

''हॅलो भूमी कुठे आहेस? काल ठरल्याप्रमाणे नाना-माईंना घेऊन तू इथे होतीस.'' क्षितीज भूमीला फोनवर विचारत होता. पत्रकार आलेले होते. भूमीच्या लग्नाचे सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी नाना आणि माई तिथे उपस्थित राहणार होते. पण भूमी अजूनही तिथे पोहोचलेली नव्हती. ''मला शक्य होणार नाहीय. बहुतेक.'' पलीकडून भूमी बोलत होती. ''का? काय झालं? मी घ्यायला येऊ का?'' क्षितीज ''नको. माई आणि नाना पोहोचतील एवढ्यात. मी प्रयत्न करते. जमेल का माहित नाही.'' भूमी ''ओके, नानांना तरी पुढे येउ देत. नाहीतर फार गोंधळ होईल. आणि मला इथे सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागेल.'' क्षितीज ''हो, ते आले असतील बघ. बाय. कॉल यु लेटर.'' म्हणत तिने फोन ठेवला.