नक्षत्रांचे देणे - ३९

  • 7.3k
  • 3.9k

''तू माझ्या आयुष्यात येण्याआधी मैथिली होती. ती खूप चुकीचं वागली तरीही मी तिच्याशी प्रामाणिक होतो, कारण माझ्यासाठी प्रेमाची व्याख्याच वेगळी आहे. त्यात मी माझं कर्तव्य सोडत नाही. तू मागितलं नाहीस तरीही माझं वचन आहे तुला. काहीही झालं तरीही, जिथे असू तिथे आपण एकत्रच असू.'' क्षितीज ''थँक्स. माझी आई म्हणायची, 'दूर कुठून, त्या नक्षत्रातून तुला न्यायला कोणी राजकुमार येणार.' तू आमच्या सोबत आल्यावर तो काय एकटाच राहणार इथे. तू त्याच्या सोबत राहा.' विभास आयुष्यात आल्यावर आईच्या गोष्टी स्वप्नवत वाटायला लागल्या. पण आज वाटतं, त्या दूरवरच्या नक्षत्रांनी तुला माझ्यासाठी बनवलं असणार किंवा मला तुझ्यासाठी.'' भूमी वर आभाळाकडे बघत म्हणाली. ''नक्षत्रांचा माहित नाही,