नक्षत्रांचे देणे - ३८

  • 6.8k
  • 3.6k

'संध्याकाळ झाली तेव्हा निधीने नानांच्या मोबाइलवर फोन केला होता. क्षितीज भूमीला शोधात गावी येईल निघाला आहे, हे समजल्यावर नानांनी ताबडतोप भूमीला त्याला फोन करण्यासाठी सांगितले. भूमीचा फोन अजूनही बंद होता. तिने तो चालू केला आणि क्षितिजला फोन लावला. आता त्याचा फोन बंद येत होता.' काय करावे हे भूमीला कळेना. 'तिथून निघताना मी फोन करत होते, तो त्याने उचलला नाही. आणि आता तो गावी का येतोय? त्याला जर विभास बद्दल सगळे कळले आहे तर त्याचा गैरसमज होणे साहजिकच आहे. मग एवढ्या लांब येण्याचे कारण काय? मला जाब विचारायला?' एक ना अनेक प्रश्नांची सरमिसर तिच्या मनात सुरु होती. त्याच्या घरी कोणाला फोन