‘इकडे संध्याकाळी मेघाताईंनी क्षितीज आणि घरी सगळ्यांचा कानावर भूमी बद्दल समजलेले सत्य सांगितले. त्यांना अपेक्षित होते कि क्षितीज चिडेल, पण तसे झाले नाही. तो ''आई आपण रात्री बोलू, मी आलोच.'' बोलून तिथून तडक बाहेर निघाला. ‘एवढी मोठी गोष्ट समजूनही याची सौम्य प्रतिक्रिया कशी? हा भूमीला जाब विचारायला गेलाय का?' हे मेघाताईंना समजेना. त्या आणि आज्जो झालेल्या प्रकाराने अगदी डिस्टर्ब झाल्या होत्या. यामधून क्षितीज कसा बाहेर पडेल? कि मैथिली प्रकरण सारखंच तो स्वतःला त्रास करून घेईल? असे एक ना हजार प्रश्न त्यांना पडले होते. ***** 'मनाशी पक्का विचार करून भूमीने एक मेल ड्राफ्ट केला. तो कंपनीच्या HR ला पाठवून दिला. आपली