नक्षत्रांचे देणें - ३६

  • 6.2k
  • 3.4k

'कोण बरे असेल ती व्यक्ती? एवढ्या तातडीने मला का बरे बोलावून घेतले असेल? आणि कोणती महत्वाची माहिती सांगणार आहे?' या विचारात मेघाताई हॉटेलमध्ये आल्या. मोबाइलवर त्यांनी तो निनावी नंबर डाइल केला. पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. थोडावेळ त्या तिथेच बसून राहिल्या, आणि काही वेळातच एक गोरागोमटा तरुण येऊन त्यांच्यासमोर बसला. ''हाय मी विभास... विभास. मीच आपल्याला फोन करून इथे यायला सांगितलं होतं.'' विभास मेघाताईं पर्यंत पोहोचला होता. भूमी आणि क्षितिजच्या सुरु होणाऱ्या नात्यामध्ये कटूपणाचे बीज पेरण्यासाठी त्याने जय्यत तयारी केली होती. ''होय, पण आपण? आणि कोणत्या महत्वाच्या कामासाठी मला इथे बोलावलं आहे.'' मिसेस सावंत त्याला आश्चर्याने विचारात होत्या. ''तुमच्या होणाऱ्या