नक्षत्रांचे देणे - ३५

  • 6.4k
  • 3.7k

‘आतलं यावरून ती बाहेर येईपर्यंत क्षितीज तिथेच सोफ्यावर आडवा झाला होता. टाय-कोट बाजूला ठेवून तो शांत झोपला होता. त्याच्या निरागस चेहेऱ्याकडे बघून तिने ओळखले, कि दिवसभरच्या धावपळीने आणि मेंटली स्ट्रेसने तो खूप थकला आहे. अगदीच न राहवून ती त्याच्या जवळ गेली. त्याच्या केसांवर हात फिरवत ती तिथेच शेजारी बसली. तिने दोनवेळा त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो झोपलेलाच होता. 'खूप थकलाय वाटत, झोपूदेत इथेच.' म्हणत तिने त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले, आणि ती उठणार एवढ्यात त्याने डोळे उघडले होते. तिच्या हाताला पकडून स्वतःकडे ओढत त्याने 'काय' म्हणून विचारले. त्याच्या एवढ्या जवळ जाऊन ती थोडी लाजली. ''इथेच झोपणार आहेस का?''