नक्षत्रांचे देणे - ३२

  • 6.1k
  • 3.6k

‘हॉटेल सनशाइनला तळमजल्यावर शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सगळी अरेंजमेंट आणि रोषणाई बघून क्षितिजला आश्चर्य वाटले. क्षितीज आणि भूमी तिथे पोहोचले. सगळे त्याची वाट बघत होते. काइट्स माउंटनला आपल्याला क्षितिजच्या आईने बोलावल होतं, हे तिला क्षितिजने येताना गाडीमध्ये सांगितलं, त्यावर तिचा विश्वासच बसेना. उगाच लाइमलाइटमध्ये येन तिला आवडत नव्हतं. त्यामुळे पार्टीमध्ये भूमी स्टेजपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करत होती, मेघाताई तिला एकटी सोडायला मागेनात. केक कटिंग करून झालं होतं. सगळे मस्त डिनरचा आस्वाद घेत होते. क्षितिजला शुभेच्छा देणाऱ्यांची नुसती मांदीआळी होती. आपण काय करावं? घरी जायला निघावं का? या विचारात असतानाच भूमीला मिस्टर सावंत म्हणजे क्षितिजच्या पप्पांनी आवाज दिला.