वेगळा - भाग २

  • 6.2k
  • 3.1k

भाग -२ जवळ जवळ पंधरा दिवस बाबूचा पाय हा बांधलेल्या अवस्थेतच होता, त्या काळात बायडा दोन तीन वेळा घरी येऊन त्याची विचारपूस करून गेली, ती घरी येई तेव्हा बाबू जागा असला तरी झोपेचे सोंग घेऊन नुसता पडून राही, मग ती त्या आईकडे किंवा बहिणीकडे चौकशी करून निघून जाई, एक दिवस मात्र जेव्हा ती घरी आली तेव्हा बाबू खाटेवर चहा पीत बसला होता , तेव्हा त्याला कुठे तोंड लपवू अस झाल होत , पण आता तिच्याशी बोलण्या शिवाय काही पर्याय न्हवता., बायडा तो जागा आहे हे पाहून त्याच्या जवळ जाऊन बसली आणि त्याच्या दुखावलेल्या पायाला नकळत तिने हात लावला, बाबू वैतागतच