वेगळा - भाग १

  • 7.8k
  • 3.9k

भाग – १ अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच - साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती, तो जिथे झोपायचा त्या घराच्या ओसरीला लागुनच एक सार्वजनिक नळ होता सकाळी सर्व वस्ती तिकडे येऊन पाणी भरायची, तिकडे त्यांची कलकल , भांडण , पण ह्याला मात्र जणू ते नेहमी होत, त्याला त्यातही गाढ झोप लागलेली असायची. शेजारी त्याच घर होत सहा वाजले कि आई त्याच्या नावाचा सपाटा सुरु करायची " बाबू , ए बाबू , शाळेत जायचय न तुला चल उठ , बास झाली झोप, आईच्या