रघुवीरच्या घरी भरपूर पाहुणे होते. जानकी नवीन घरी काहीशी गोंधळली होती.गृहप्रवेशा नंतर सगळे महत्वाचे विधी आटोपले.जानकीची व्यवस्था जिजींच्या खोलीत केली होती. रात्री जेवणे आटपून ती खोलीत चेंज करायला गेली.गायत्री ,मुक्ता आणि राधा ताई तिच्या मदतीला होत्या.तिला एकटं वाटू नये म्हणून सगळे तिच्या अवती भवती राहत होते.जानकीने नवीन साडी सोडून साधी साडी नेसायला घेतली पण काही केल्या तिला साडी नेसता येत नव्हती मग गायत्रीने तिची मदत केली.जानकीने स्वतःला आरशात पाहिले. आज ती स्वतःच वेगळंच रूप ती बघत होती. चेहरा धुतल्याने तिचा मेकअप उतरला होता ,पण तिच्या डोळ्यांतील काजळ तसच होत. तसही तिला कुठल्या सौंदर्य प्रसाधन साधनांची गरज नव्हती. ती तशीच खूपच