अॅलिबीप्रकरण १४पाणिनी पटवर्धन इन्स्पे.होळकर बरोबर पोलीस चौकीत पोचला.बघतो तर कनक ओजस आधीच एका पोलिसा बरोबर तिथे बसलेला दिसला.पाणिनी आश्चर्याने अवाक झाला. “ कनक काय भानगड आहे ही ? तू इथे कसा? ““ या घटके पर्यंत तरी मला कोणी काही सांगितलं नाही.” ओजस म्हणाला आणि जागे वरून उठून पाणिनी कडे गेला.“ चल, पाणिनी, सरकारी वकील वाट बघताहेत आत.” इन्स्पे.होळकर म्हणाला.ओजस पाणिनी जवळ येऊन म्हणाला, ” पाणिनी त्यांनी काहीही सांगू दे, पण मी तुझ्याच बाजूने आहे. तू काही गोष्टी वाकड्या पद्धतीने केल्या आहेस अशी माझी समजूत मी कोणालाही करू देणार नाही.” असे बोलून त्याने पाणिनी च्या हातात हात मिळवले आणि कोणाच्याही नकळत