बावरा मन - 5 - गिफ्ट..

  • 9.9k
  • 5.9k

आज लग्न असल्यामुळे सगळीकडे लगबग सुरु होती... रुचिका आणि रिद्धी अंकितला तयार करत होत्या... दुसरी कडे ब्युटीशिअन सियाला रेडी करत होती.. विराज च्या मदतीला सगळे गँग बॉईज बाहेरच बघत होते... लग्नाचा मंडप समूद्रावर टाकला गेला होता... अंकित रेडी झाल्यावर मंजिरीने रुचिका आणि रिद्धिला तयार होण्यासाठी पाठवल... अंकित कडून लग्नाआधीचे विधी करून घेतले... रिद्धिने आल्यावर त्याला फेटा बांधला... रोहिणीने त्याची नजर काढली... सगळी तयारी झाली होती... निंबाळकर कुटुंबीय खूप आनंदात होते... विराजने रक्ष , आदि , आरव आणि वीरला व्हेंन्यूला पाठवुन दिलं... सगळी तयारी झाल्यानंतर अंकित बाहेर आला...विराजने खाली बसून हात पुढे केल्यावर अंकित हातावर पाय देऊन घोड्यावर बसला... आणि बँड