वरमाला घालून झाल्यावर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.नवरदेव नवरी सजवलेल्या खुर्चीवर बसले.सगळ्यात पहिले अण्णा माई आणि जिजी,आप्पांनी सुलग्न लावले आणि वधूवराला शुभाशीर्वाद दिले.एक एक करून दोन्ही कुटूंबाकडल्या व्यक्तींनी वधूवराला आशीर्वाद दिले.रागिणी स्टेज वर त्या दोघांना शुभेच्छा द्यायला गेली.." अभिनंदन रघुवीर, अभिनंदन जानकी" रागिणीचा चेहरा कोमेजला होता.."थँक्स रागिणी..तू आलीस मला खूप आनंद झाला थांब एक सोबत फोटो घेऊ" रघुवीर म्हणाला. फोटोग्राफर ने त्या तिघांचा फोटो काढला ,मग रागिणी तिथून निघून गेली. रघुवीरला मनातून वाईट वाटलं होतं.त्याच्या मनात अजूनही रागिणी बद्दल प्रेम होतं.हे सगळं तो तिला मिळवण्याकरिता करत होता.रागिणी तिथे आल्याच रघुवीरच्या घरच्यांना फारस रुचल नव्हतं.फोटोशूट वगैरे झाल्यावर गुरुजींनी दोघांना सप्तपदीसाठी तयार राह्यला